वापरत असाल तर तुम्हाला माहीतच आहे की आज इंटरनेट आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. ह्या शतकातील सर्वांत मोठा विचार-मंच आणि तंत्रज्ञान म्हणजे इंटरनेट असे मानले जाते. संवाद साधण्यासाठी आणि विविध गोष्टी शिकण्यासाठी इंटरनेट हे अतिशय प्रभावी माध्यम आहेच शिवाय ह्यामधून अनेक प्रकारच्या संधीही मिळू शकतात. इंटरनेट हा माहितीचा अमूल्य असा साठा असून आपल्या निर्मितीक्षमतेला आणि कल्पनाशक्तीला खतपाणी घालण्यास ह्यामुळे प्रोत्साहन मिळते.
तुम्ही काही नीतिमूल्ये पाळता का?
इंटरनेटवरील नीतिमूल्ये (एथिक्स) म्हणजे इंटरनेट वापरतानाची आपली त्यावरील वागणूक. आपण नेटवर प्रामाणिकपणे म्हणजेच सच्चेपणाने व्यवहार केले पाहिजेत आणि इंटरनेट वापरणार्या इतरांचे अधिकार तसेच मालमत्तेची जपणूक केली पाहिजे
पायरी 1 : तुम्ही तुमच्या इंटरनेटवरील व्यवहारांबद्दल कुटुंबियांना सांगता का?
इंटरनेटवरील सुरक्षिततेबद्दलची पहिली पायरी म्हणजे नेटवरील आपल्या व्यवहारांबद्दल कुटुंबियांना माहिती देणे. तुमच्या आईबाबांचे आणि इतरांचेही तुमच्यावर प्रेम आहे. ते तुमच्या सुरक्षितेतची काळजी घेत असतात आणि कठीण प्रसंगी तुम्हाला भक्कमपणे पाठिंबाही देतात. त्यामुळेच तुम्ही इंटरनेटवर शेअर केलेली आणि अनुभवलेली प्रत्येक बाब त्यांना माहीत असणे आवश्यक आहे.
पायरी 2 : तुम्ही कुटुंबातला सामाईक कॉँप्यूटर वापरता का?
वापरत असल्यास, इंटरनेटवर असताना, तुम्ही कुटुंबाने घालून दिलेले नीतिनियम पाळणे अतिशय गरजेचे आहे कारण कुटुंबातील इतर व्यक्तीदेखील त्यांच्या विविध कामांसाठी (बँकिंग, खरेदी इ.) कॉँप्यूटर आणि नेटचा वापर करीत असतात. ह्या व्यवहारांची संवेदनशील माहिती तिथे असल्याने ती तुम्ही तुमच्या ऑनलाइन फ्रैंडसोबत शेअर केलीत तर त्यामुळे तुमच्याच कुटुंबाचे प्रचंड आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणूनच, कुटुंबाच्या नीतिनियमांनुसारच कुटुंबातील कॉँप्यूटरचा वापर करा.
बरेचसे ऑनलाइन गेम खेळण्यासाठी किंवा काही व्हीडिओ पाहण्यासाठी क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरावे लागतात. काही वेला कुटुंबियांकडून अशी संवेदनशील माहिती सामाईक कॉँप्यूटरमध्ये चुकून तशीच राहू शकते. अशा माहितीचा वापर, त्यांच्या परवानगीखेरीज, इतरांनी करायचा नसतो.
पायरी 3 : तुम्हाला व्हीडिओ पहायला आवडते का?
नेटवर व्हीडिओ पहायला नेहमीच मजा येते परंतु त्याचवेळी त्यासंदर्भात काही धोकेही असू शकतात – त्यांमध्ये घातक (मॅलिशिअस) लिंक्सअसू सकतात व त्या तुम्हाला अयोग्य, अनैतिक किंवा बेकायदेशीर बाबींकडे नेऊ शकतात. तुम्हाला असा काही संशयास्पद लिंक दिसल्या तर तसे कुटुंबियांना सांगा.
ऑनलाइन भेटणार्या व्यक्ती सर्वस्वी अपरिचित असतात ह्याची कुटुंबियांना जाणीव द्या
पायरी 4 : तुम्ही एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला (सेलेब्रिटीला) इंटरनेटवर फॉलो करता का?
नटनट्या, खेळाडू, राजकारणी तसेच इतरही क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींना नेटवर फॉलो करणारे किंवा त्यांच्याबद्दल ऑनलाइन चॅट (चर्चा) करणारे खूप लोक असतात. अशा व्यक्तींच्या नावाने तुम्हाला अनेक वेबसाइट्स दिसतील परंतु खुद्द त्या व्यक्तीने किंवा एखाद्या नामवंत वृत्तपत्र वाहिनीने चालवलेल्या असा साइट्सच अस्सल असतात हे लक्षात ठेवा.
तुम्ही ह्यासंदर्भात सर्च (शोध) घेतल्यावर, अशा व्यक्तींनी किंवा त्यांना अधिकृतपणे प्रसिद्धी देणार्यांनी चालवलेल्या साइट्सऐवजी, फॅन साइट्स उघडण्याची शक्यता असते. अशा साइट्सबाबत अधिक काळजी घेणे गरजेचे असते. इच्छित साइटपासून ह्या वेगळ्या काढणे अवघड असले तरी सर्च रिझल्टमध्ये दिसणार्या यादीमध्ये त्या पुष्कळच खाली असतात
पायरी 5 : इंटरनेटवर दिसणारे सगळेच खरे असते असे तुम्ही मानता का?
बर्याचजणांना असे वाटते की, इंटरनेटवर दिसणारी प्रत्येक गोष्टसत्य आणि योग्यच असते. परंतु वास्तविक नेटवर दिसणारा मजकूर हा प्रत्येक वापरकर्त्याचे वैयक्तिक मत किंवा विचार असतो आणि तो मांडण्यावर कोणाचेही नियंत्रण नसते किंवा त्यामागे कोणाचेही मार्गदर्शन नसते. इंटरनेट हा उपयुक्त माहितीचा मोठा खजिना आहे हे सत्य असले तरी (हे माध्यम स्वस्त आणि सर्वव्यापी असल्याने) त्यावरून खोटी किंवा चुकीची माहिती पसरवणेही तितकेच सहजशक्य असते.
सर्वच माहिती अशी मुळीच नसते परंतु स्वतःची कलुषित किंवा एककल्ली मते, धोरणे किंवा उत्पादनांचाही प्रसार करण्यासाठी काही लोक नेटचा उपयोग करतात हे तुम्ही ध्यानात ठेवणे महत्त्वाचे आहे. दिसणार्या माहितीबद्दल तुम्ही काळजी घेणे आणि, इंटरनेटच्या विविध स्त्रोतांचा वापर करून, तिची पडताळणी करणे आवश्यक आहे.
पायरी 6 : तुम्हाला गेम्स खेळायला आवडते का?
होय, मुलांना गेम्स खेळायला खूपच आवडते.ऑनलाइन गेम्स खेळायला आणि इतर अपरिचित व्यक्तींसोबत खेळून अधिक आनंद मिळवायला सर्वांनाच आवडते. मित्रपरिवार वाढवण्यासाठी इंटरनेट ह्या माध्यमामधून मोठी संधी मिळते. परंतु काही वेबसाइटसकडून, तेथील गेम फुकट (फ्री) असले तरीही, खेळणार्यांच्या क्रेडिट कार्डचे तपशील विचारले जातात. तरीही आपण नेटवरचे फ्री गेम्स खेळतोच
ह्याच वेळी तुम्ही लक्षात घेणे गरजेचे आहे की कुटुंबियांच्या क्रेडिट कार्डचा तपशील नेटवर शेअर करणे धोक्याचे आहे कारण कधीकधी आपोआप देखील रक्कम कापली जाऊ शकते (ऑटोमेटेड् चार्जेस) व त्यामुळे तुमच्या कुटुंबाचे आर्तिक नुकसान होऊ शकते. तसेच वेबसाइटवर दिल्या गेलेल्या अशा माहितीचा दुरूपयोग ओळख-चोरीसाठीही इतरांकडून केला जाऊ शकतो.
पायरी 7 :तुम्हाला समाजाशी मैत्री करायला आवडते का?
होय, मुलांना समाजाशी मैत्री करायला आवडते. मित्रांशी संपर्क ठेवायला आणि नवीन मित्रमैत्रिणी मिळवायला आपणां सर्वांनाच आवडते. मित्रपरिवाराचे वर्तुळ वाढवण्यासाठी इंटरनेट हे खूपच उपयोगी माध्यम आहे.
परंतु लहान मुलामुलींना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्यामागची कारणेही समाजातच असतात. काहींना दमदाटी केली जाते (बुलिइंग) तर इंटरनेटवरील काही व्यक्ती लज्जास्पद मजकूर पाठवतात किंवा घातक साइट्सकडे नेणार्या लिंक्स पोस्ट करतात. ह्यासाठी शेअर केलेले पासवर्ड वापरले जातात.
आपण कोणीही स्वतःचे पासवर्ड इतरांना – अगदी जवळच्या मित्रांनाही - सांगू नयेत (शेअर करू नयेत). तसेच शाळेतील किंवा सायबर कॅफेतील सार्वजनिक म्हणजेच सामाईक कॉँप्यूटर वापरल्यानंतर आपले खाते (काउंट) पूर्णपणे बंद करावे कारण तुमच्यानंतर त्या कॉँप्यूटरचा उपयोग इतरही व्यक्ती करतात.
पायरी 8 : तुम्ही तुमची ओळख खुली (ओपन) ठेवता का?
सायबर हल्लेखोर आणि घुसखोरांच्या दृष्टीने लहान मुलामुलींची ओळख फारच महत्त्वाची असते. लहानांना लक्ष्य करण्यासाठी इंटरनेटवरील असे सायबर-गुन्हेगार त्यांची पूर्ण माहिती मिळवतात – नाव, पत्ता, शाळेचे नाव, इयत्ता इ. अशी मिळवलेली ही माहिती त्यांना मुलांच्या तसेच मुलांच्या कुटुंबियांच्याही पासवर्डबद्दलचा अंदाज बांधण्यासाठी उपयोगी पडते. कारण हे पासवर्ड साधारणपणे कुटुंबियांच्या नावांशी निगडित असतात. शिवाय हीच माहिती वापरून हे चोर तुमच्याशी ऑनलाइन मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करू शकतात ज्यायोगे त्यांना तुमच्या कुटुंबियांची आणखी माहिती मिळते. तुमच्या कुटुंबियांची नावे इ. वापरून असे लोक स्वतःसाठी क्रेडिट कार्ड इ. मागवू शकतात. म्हणूनच मुलामुलींनी सोशल नेटवर्कवर संवेदनशील तसेच आर्थिक बाबींशी संबंधित कोणतीही खाजगी माहिती नेटवर देऊ नये आणि अपरिचितांबरोबरच माहितीच्याही व्यक्तींपासून स्वतःचे खाजगी बाबी गुप्त ठेवाव्या.