अनेक महिला सायबर गुन्ह्यांचा बळी पडत आहेत. इंटरनेटच्या वाढता प्रसार आणि मोबाईल डिव्हाइसेसद्वारे माहितीचा वेगवान प्रचार यामुळे धोक्यांच्या नवीन संधी निर्मान झाल्या आहेत ज्यामुळे काही महिला धोक्यात येऊ शकतात, म्हणूनच धोक्यांपासून सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे.

संगणकांमधील सुरक्षा संसाधनांचा योग्य केल्या शिवाय वापरल्या जाणार्या वैयक्तिक संगणकाचा बेकायदेशीर कामासाठी वापर होऊ शकतो. हे शोषक व्हायरस, ट्रॉजन, की लॉगर आणि काहीवेळा वास्तविक हॅकर्स असू शकतात. याचा परिणाम माहितीची चोरी किंवा नुकसान, वैयक्तिक माहिती सार्वजनिक करणे, संकेतशब्द, प्रमाणपत्रे ई. ची चोरी करणे इत्यादी होऊ शकते. म्हणून, आपल्या वैयक्तिक संगणकामधे काही गडबड होण्यापूर्वी त्याचे संरक्षण करा आणि आपले संगणक सुरक्षित करा.

आपल्या वैयक्तिक संगणकाचा वापर करताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

आपला वेबकॅम कनेक्टटेड करून ठेऊ नका: असे असंख्य अँप्स आहेत जे तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या हालचाली कैद करू शकतात जर तुमचा वेबकॅम सुरु असेल. सावधगिरी म्हणून कॅमेरा ची परवानगी देणे बंद करा आणि वापरात नसताना आपल्या कॅमेराची लेंस बंद किंवा संरक्षित ठेवा. मॉनिटर, मॉडेम, स्पीकर्स इत्यादीसारख्या बाह्य डिव्हाइसेसचा वापरा करून झाल्यावर त्यांना योग्यरित्या बंद करा आणि आपला वैयक्तिक संगणक बंद करा

वापरण्यापूर्वी बाह्य डिव्हाइसेस स्कॅन करा:आपण आपल्या वैयक्तिक संगणकावर वापरण्यापूर्वी यूएसबीसारख्या बाह्य डिव्हाइसेस स्कॅन केल्याचे सुनिश्चित करा. अनोळखी व्यक्तींपासून बाह्य उपकरणांचा वापर टाळा

आपल्या डेटाचाचा बॅकअप घ्या :आपल्या डेटाचा बॅकअप घेतल्यास जर अचानक विचेचा दाब (व्होल्टेज) कमी ज्यास्त झाल्यास, वादळ किंवा वीज पडल्यास किंवा सॉफ्टवेअर क्रॅश झाल्यास आपला डेटा सुरक्षित राहील. 

आपण नवीन प्रकारच्या रन्सोमवेअरचा बळी पडल्यास जो आपले संवेदनशील डेटा एन्क्रिप्ट करूशकत अश्या परिस्थिती मध्ये देखील आपला डेटा सुरक्षित राहतो. आपण स्वतः आपली महत्त्वपूर्ण माहिती / दस्तऐवज बाह्य हार्ड ड्राइव्हवर स्थानांतरित करुन बॅक-अप घेऊ शकता.

आपल्या वैयक्तिक संगणकावर अवैध्य प्रवेश नियंत्रित करणे:

सार्वजनिक ठिकाणी आपला कॉम्पुटर सुरु करून कुठे जाऊ नका. आपल्या संगणकाची भौतिक सुरक्षा तांत्रिक सुरक्षिततेसारखीच महत्त्वपूर्ण आहे.

परवाना असलेले सॉफ्टवेअर वापरा:

नेहमीच परवानाकृत सॉफ्टवेअर इन्स्टाल करा जेणेकरून आपल्याकडे आपल्या ऑपरेटिंग सिस्टम आणि अप्लिकेशन ची नियमित अपडेट असतील. ओपन सोअर्स सॉफ्टवेअरच्या बाबतीत, वारंवार अपडेट करा

सॉफ्टवेअर इन्स्टाल करतांना त्या सोबत च्या आटी विषयी सविस्तर वाचा: इन्स्टॉल करण्यापूर्वी विक्रेता / सॉफ्टवेअरद्वारा प्रदान केलेले "नियम व अटी" / "परवाना करार" वाचा.

आपल्या डिव्हाइसेसवरील सर्व ऑपरेटिंग सिस्टम अद्यतनित करा:


सिस्टम अद्यतनित करणे हे तुम्हाला विनाकारणचा उपद्रव वाटेल पण ते तुम्हालाच सुरक्षित ठेवण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. सुरक्षा अद्यतने आणि नवीनतम पॅच तुम्हाला संभाव्य धोक्यापासून दूर ठेवतील. आपण कितीही व्यस्त असलो तरी देखील त्यांना नेहमी इन्स्टॉल करा.

इंटरनेट सुरक्षाः

  • इंटरनेट वरील माहिती वापरण्यापूर्वी त्या माहितीची कॉपीराइट कुणाकडे आहे का ते तपासून घ्या किंवा कॉपीराइट विषयी समजून घ्या. इंटरनेट वापरताना नैतिकता पाळा.
  •  ऑनलाइन व्यवहार, डाउनलोड इ. करीत असताना https (हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्योर) वापरणार्या साइटवर नेहमी प्रवेश करा जे सुरक्षित आहे.
  •  साइट एसएसएल वापरत असल्यास, ते विश्वसनीय आहे किंवा नाही हे निश्चित करण्याकरता साईट च्या मालकांची मालकी प्रमाणपत्र, प्रमाणपत्राची समाप्ती तारीख इ. ची खात्री करा. आपण लॉक चिन्हावर क्लिक करून असे करू शकता.
  •  तृतीय पक्षाच्या (थर्ड पार्टी) वेबसाइट्सऐवजी फाइल्स डाउनलोड करण्यासाठी फक्त मूळ वेबसाइट वापरा.
  •  डाऊनलोड करण्यापूर्वी अपडेट केलेल्या अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरने स्कॅन करा.
  •  दुर्भावनायुक्त (फसव्या) ट्राफिकं पासून संरक्षण करण्यासाठी सॉफ्टवेअर फायरवॉल स्थापित करा आणि योग्यरित्या कॉन्फिगर करा.

डेटा सुरक्षा

  • आपल्या ऑपरेटिंग सिस्टम मधील
    ऑटो अपडेट सुरु करा आणि नियमितपणे अपडेट करा.
  • विश्वसनीय वेबसाइटवरून अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा. नवीन अपडेट्स आल्यावर आपले अँटी व्हायरस ऑटोमॅटिक अपडेट होते का याची खात्री करून घ्या.
  • आपली मौल्यवान माहिती सुरक्षित करण्यासाठी " एन्क्रिपशन " वापरा.
  •  संगणकावर "ऍडमिन " अकाउंट साठी तसेच ईमेल क्लायंट, आर्थिक अँप्लिकेशन्स (अकाउंटिंग इ.) सारख्या इतर महत्वाच्या अँप्लिकेशन्स साठी मजबूत (पक्का) पासवर्ड वापरला जावा.

बॅकअप:

हार्ड डिस्क करप्ट झाल्यास किंवा सिस्टमला पुन्हा इन्स्टॉल केल्यामुळे डेटा खराब होऊ शकतो. सीडी / डीव्हीडी किंवा यूएसबी ड्राइव्हवर ठराविक कालांतराने आपला संगणक डेटाचा चा बॅकअप घ्या.

पुनर्प्राप्ती (Recovery) डिस्कः

अनिश्चित ड्राइव्हर्स / अज्ञात सॉफ्टवेअर प्रकाशक यासारख्या बदलांमुळे, सिस्टम बूट अपयशी झाल्यास ऑपरेटिंग सिस्टम रिकव्हर करण्यासाठी संगणक च्या उत्पादक / विक्रेत्याने पुरवलेली रिकव्हरी डिस्क नेहमी ठेवा.

  •  सर्वोत्तम सिस्टम कामगिरीसाठी स्टार्टअप प्रोग्रामचे परीक्षण / नियंत्रण केले पाहिजे.

ब्राउझर सुरक्षाः

  • आपल्या वेब ब्राउझरला नवीनतम पॅचसह नेहमी अद्ययावत करा.
  •  ब्राउझरमध्ये अंतर्भूत असलेल्या गोपनीयता किंवा सुरक्षा सेटिंग्ज वापरा.
  •  कन्टेन्ट फिल्टरिंग सॉफ्टवेअर देखील वापरा.

ई-मेल सुरक्षा:

  • आपल्या ईमेल खात्यासाठी नेहमीच मजबूत (कठीण) पासवर्ड वापरा.
  •  ईमेल मधे जोडलेली फाईल उघडण्यापूर्वी नेहमीच अद्ययावत अँटी-व्हायरस आणि एंटी-स्पायवेअरस ने ईमेल स्कॅन करा.
  • स्पॅम फोल्डर रिकाम करायचं नेहमी लक्ष्यात ठेवा.

वायरलेस सुरक्षा:

  • डिफॉल्ट ऍडमिनिस्ट्रेटोर पासवर्ड बदला.
  • WPA चालू करा (वाय-फाय संरक्षित प्रवेश) / WEP एन्क्रिप्शन
  • डिफॉल्ट एसएसआयडी(SSID) बदला.
  • वापरात नसताना वायरलेस नेटवर्क बंद करा.

मोडेम सुरक्षाः

  • डीफॉल्ट संकेतशब्द/पासवर्ड बदला.
  • ;वापरात नसताना बंद करा.
Page Rating (Votes : 2)
Your rating: