सध्या, इन्स्टंट मेसेजिंग आपल्यापैकी बर्याच लोकांसाठी कामिनेकेशन चे आवडते माध्यम म्हणून विकसित झाले आहे. जलद आणि सुलभ संवाद साधण्याची क्षमता ही व्यवसायासाठी आणि वैयक्तिक कामिनेकेशन साठी (संप्रेषणासाठी) एक आदर्श माध्यम बनले आहे. हे अॅप्स वापरकर्त्यां मध्ये इतके प्रचलित झाले आहेत त्याचे मुख्य कारण म्हणजे हे वापरण्यास सोपे आणि त्याहून महत्वाचे म्हणजे विनामूल्य आहेत. व्हाट्सएप, स्नॅपचॅट, व्हायबर, वी चाट आणि असे बरेच इन्स्टंट मेसेंजर अॅप्स आहेत.
मोबाइल इन्स्टंट मेसेजिंगमधील धोके
आजच्या जगात महिला जीवनातील सर्व पैलूवर आघाडीवर आहेत. जरी आजच्या या समकालीन जगात सध्याची परिस्थिती महिला आघाडीची असली तरी देखील महिला अजूनही पीडित आणि समस्यांना बळी पडत आहेत, वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात त्यांना अडचणी आणि त्रास होत आहे. इंटरनेटची वाढणारी पोहोच आणि वेगळ्या साधनांद्वारे माहितीचा वेग वाढल्याने नवीन संधी आणि धोके देखील समोर येतात ज्यामुळे काही महिला अडचणीत येऊ शकते. महिलांविरुद्ध सायबर धोक्यांमुळे आम्हाला सुरक्षित राहण्याचे मार्ग शोधण्यात गुंतले पाहिजे.
इन्स्टंट मेसेंजर वापरताना काही जोखमी टाळण्यासाठी काही उपाय
संवेदनशील माहितीचा लीक होणे
बरेच इन्स्टंट मेसेजिंग अॅप्स आपली खाजगी माहिती उघड करणे सोपे करतात आणि ती माहिती फसवेगिरी करण्या साठी वापरली जाऊ शकते. यापैकी बहुतेक व्यक्तीगत प्रोफाइल पिचर सोबत संबंधित असतात. आपला फोन नंबर ज्या कुणाकडे असेल ती व्यक्ति आपल्या प्रोफाइल मध्ये जाऊन आपले प्रोफाइल पिचर पाहू शकते. यामुळे महिलांच्या प्रायवसीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो आणि म्हणून याला गंभीरतेने घेण्याची गरज आहे आणि हे अॅप्स वापरणार्या महिला सुरक्षित राहतील याची खात्री करण्यासाठी नवीन मार्ग शोधणे आवश्यक आहे. सायबर स्पेसमध्ये, महिलांची सुरक्षितता सर्वोच्च आहे.
नेहमीच सुरक्षा सेटिंग्ज तपासणे आणि आपल्या प्रोफाईल वरील चित्रे प्रटेकला दिसणार नाहीत अश्या फीचर सुरू करणे असा सल्ला दिला जातो.
माहिती प्रकटीकरण - एक केस स्टडी
काही इन्स्टंट मेसेजिंग सर्व कामिनीकेशन लॉग-फाईलमध्ये सेव्ह करण्याची परवानगी देतात. लॉगमध्ये संवेदनशील डेटा समाविष्ट असू शकतो. हॅकरने कंपनीच्या सीईओच्या नोंदी चोरल्याची एक घटना नोदवली गेली. हॅकरने वेबवर बर्याच ठिकाणी लॉग पोस्ट केलेले होते, त्यामुळे कॉर्पोरेट मधील संभाव्य अडचणी पैकी सर्वात वाईट हि एक अडचण तयार तयार झाली. लॉगमध्ये व्यावसायिक भागीदार, कर्मचारी आणि संबद्ध वेबसाइट्स व संबंधित कंपनीचा संवेदनशील डेटा समाविष्ट होता. ह्या नोंदी पोस्ट केल्यानंतर कंपनीच्या ज्येष्ठ कर्मचा-यांच्या पैकी बर्याच सदस्यांनी राजीनामा दिला.
हे प्रकरण आपल्याला दर्शिवते कि जर इन्स्टंट मेसेजिंग सेशन चे परीक्षण करण्यात ह्याकर सक्षम असल्यास ते आपल्यासाठी किती धोकादायक असू शकते. या प्रकरणात जरी लॉग-फाइल्स चोरी झाली असती तरी डेटा-पॅकेट्सचे स्निफिंग केल्यामुळेही देखील तेवढेच नुकसान झाले असते.
देखरेख / ट्रॅकिंग:
लायू लोकेशन शेयर करणे हे लोकेशन शेयर करण्यामधील गंभीर धोका आहे जो महिलांना होऊ शकते. आपला नंबर माहित असलेल्या कोणत्याही गुन्हेगाराला आपल्या प्रवासाची व ठिकाणाची माहिती करून घेण्यासाठी आणि बेकायदेशीर गोष्टींचे नियोजन करण्यासाठी लोकेशन सर्व्हिस चा ताबा मिळू शकतो.
केवळ ओळखीच्या लोकांन सोबत लोकेशन शेअरिंग सर्व्हिस वापरा आणि अनोळखी लोकांना लोकेशन शेअर करणे टाळा
हॅकिंगः
स्मार्ट फोन मध्ये इतर अनेक इन्स्टंट मेसेजिंग ऑप्सची तपासणी केली गेली ज्यामध्ये बरेच ऑप्स आपली वैयक्तिक माहिती घेतात व ट्रान्सफर देखील करतात. इन्स्टंट मेसेजिंगमधील मार्केट लीडर वर अॅड्रेस बुक आणि वैयक्तिक माहिती अनएन्क्रिप्टेड स्वरूपात अॅप सरवर वर पाठवल्याचा आरोप केला आहे. या मुळे आयडी समेत खाजगी माहिती मधील बरेच बारकावे, थर्ड पार्टीस ला पाहण्यासाठी आणि वापरण्यासाठी सहज उपलब्ध झाले आहे.
काही अप्लिकेशन इतर लोकांच्या इन्स्टंट मेसेजिंग कन्व्हरशेषशन मध्ये प्रवेश करण्यासाठी आणि वैयक्तिक माहितीच्या प्रवेशासाठी विकसित केले गेले
आपण निवडलेल्या अॅप्स मध्ये सर्व माहिती सर्व्हरवर ट्रान्सफर करण्या आधी एन्क्रिप्ट फॉर्ममध्ये जात आहे याची खात्री करा.
फसवेगिरी
बरीच संवेदनशील माहिती हॅकर्ससाठी ऑनलाइन साठवली गेली आहे. हॅकर इन्स्टंट मेसेजनींग द्वारे पासवर्ड, सिस्टम कॉन्फिगरेशन ची माहिती आणि संवेदनशील फाइल्स प्राप्त करू शकते. हॅकर्स इतर युझर्सना बर्याच वेगवेगळ्या प्रकारे फसवू शकतो. वारंवार केल्या जाणार्या हल्ल्यामुळे सहजपणे असुरक्षित युझर च्या अकाउंट ची माहिती चोरली जाते.
IM चाट द्वारे गोपनीय माहिती शेअर करणे टाळा.
छळणूक / स्पॅमिंग:
यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून सतत संपर्क करणे, त्रास देणे आणि बळी पडलेल्या लोकांना घाबरविण्यासाठी केला जातो. हि एकमेव घटना नसून वारंवार होणारी घटना आहे; उदा., सतत मोबाइल कॉल / मेसेज करणे; व्हॉइसमेल पाठवून मेल बॉक्स भरणे जेणेकरून कुण्या दुसऱ्या व्यक्तीचे मेसेज येणार नाहीत.
मिस्लेनीयस कोडचा प्रसार करण्याचा सोपा मार्ग
आईएम वर्म्स म्हणजे आयएम नेटवर्क्समध्ये पसरणारे स्वतःची रेप्लिका करणारे मालवेअर होय. जेव्हा एखादे आईएम वर्म्स एखाद्या पीसीला संक्रमित करते, तेव्हा ते आईएम क्लायंटसाठी अॅड्रेस बुक शोधते, ज्यामधील मित्र यादी किंवा कॉन्टॅक्ट लिस्ट शोधते आणि संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात असणाऱ्यांना स्वतःस पाठविण्याचा प्रयत्न करते. काही आयएम वर्म्स फसव्या कोड असलेल्या मेसेज स्वीकारण्यासाठी प्राप्तकर्त्यास फसविण्यासाठी सोशल इंजिनियरिंग तंत्रांचा वापर करतात. स्पॅम पसरवण्या साठी इन्स्टंट मेसेजिंग सॉफ्टवेअर देखील वापरले जात आहे. ई-मेलऐवजी IM द्वारे स्पॅम वितरीत केले जातात जे 'स्पिम' म्हणून ओळखले जातात.
क्लिक करण्यापूर्वी प्राप्त झालेल्या लिंक बद्दल संशयास्पद विचर करा; आपल्या मित्रांने ती पाठवली आहे का हे त्याला विचारून खात्री करा.
नेटवर्क समस्या
हल्ल्यांमध्ये मध्ये इन्स्टंट मेसेजिंग अप्लिकेश सर्व्हिस न मिळण्याचा धोका जास्त आहे. हे हल्ले इंस्टंट मेसेंजरला क्रॅश करतात. हे संसाधनांचा वापर करण्यासाठी, कॉन्फिगरेशन नष्ट करण्यासाठी आणि नेटवर्क घटक बदलण्यासाठी नेटवर्कचा वापर करून नेटवर्कमध्ये प्रवेश करण्यापासून वैध युझर्स ना प्रतिबंधित करतात. घुसखोर संदेशांना व्यत्यय आणण्यास सक्षम होतात, अवैधरित्या एकमेकांशी संवाद साधण्यासाठी डिव्हाइसेस सेट करतो आणि आपल्या ऑपरेटिंग सिस्टमला योग्यरित्या कार्य करण्याची आवश्यकता असलेल्या इतर संसाधनांचा वापर करतो.
बर्याचदा महिला वापरकर्ते मुख्य लक्ष्य असतात. एक सामान्य प्रकारचा हल्ला ज्या मध्ये एखाद्या विशिष्ट युजरला पुर आल्या प्रमाणे खूप मोठ्या प्रमाणावर मेसेज पाठवणे. तथापि, हॅकरला फ्लड - अट्याक करण्यास परवानगी देणारी अनेक साधने आहेत. जोपर्यंत बळी पडलेल्याला आपण बळी पडल्याबद्दल कळते, तो पर्यंत डिव्हाइसचे कदाचित प्रतिसाद देणे बंद पडू शकते. म्हणून, इन्स्टंट मेसेंजरच्या लिस्ट वर दुर्लक्ष करून आक्रमण कर्त्यास आपले खाते जोडणे खूप कठीण असू शकते
नेटवर्क वापरताना, संस्थांनी त्यांचे नेटवर्क इंटरनेट-आधारित IM ट्राफिक व अंतर्गत IM ट्रॅफिक वेगळे करण्यासाठी अपडेट करणे आवश्यक आहे
आयएम सॉफ्टवेअर भेद्यता
इतर कोणत्याही सॉफ्टवेअर अप्लिकेशन प्रमाणेच, लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग मध्ये देखील सामान्य सुरक्षा भेद्यतांचा इतिहास आढळतो. IM अप्लिकेशन इंस्टाल केल्याने स्मार्टफोन / डेस्कटॉपवर नवीन असुरक्षितता सादर करू शकते.
अँटीव्हायरस चा वापर करून रिअल-टाइम व्हायरस संरक्षण सुरु करा
इन्स्टंट मेसेजिंग मध्ये जर सुरक्षेचा भंग झाल्यास हॅकर्ससाठी भरपूर संधी उपलब्ध होतात कारण बरेच लोक या अनुप्रयोगाचा वापर फाइल्स ट्रान्सफर करण्याच्या हेतूने आणि इतर बर्याच वेगवेगळ्या उद्देशांसाठी करतात. इतर अडचणी बरोबर बर्याच असुरक्षित पद्धतीचा शोध घेण्यात आला आहे ज्या मध्ये हॅकर्सना सहजपणे आपल्या पीसी किंवा मोबाइल डिव्हाइसवर रिमोटली कंट्रोल मिळविण्याची परवानगी मिळते.
इन्स्टंट मेसेजिंग वापरताना बरेच फायदे आहेत तसेच या अप्लिकेशन चा वापर करताना सुरक्षा समस्या देखील आहेत. आपण फायद्यांचा आनंद घेत असल्याचे सुनिश्चित करा आणि सावधगिरीने या अप्लिकेशनचा वापर करा.