सायबर गुन्हे धोकादायक दराने वाढत आहे, आणि त्याचे सर्वात ज्यास्त बळी महिला वर्ग ठरत आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेटने लोकांची फसवणूक करणाऱ्या प्रवृतींना गुप्तपणे तसेच सहजपणे महिला आणि मुलींचा शोषण करण्यास परवानगी दिली आहे. एका अभ्यासात असा दावा केला आहे की दिवसात चार तासांपेक्षा जास्त काळ महिला स्मार्टफोन वापरतात आणि पुरुषांपेक्षा त्यांची व्यसनाधीनता जास्त असते. स्मार्टफोनचा वापर लोकांना संपर्क करणे, खेळ खेळणे आणि नवीन माहितीचा शोध घेण्याऐवजी स्त्रिया मुख्यतः सोशल नेटवर्किंग वेबसाइट वापरण्यासाठी आणि ऑनलाइन खरेदीसाठी करतात. या स्मार्टफोन मध्ये त्यांचे स्वत: चे काही वैशिष्ट्ये आहेत, परंतु सुरक्षाविषयक समस्यां बघता संवेदनशील माहितीची नोदणी देखील यात आहे. या मध्ये अनेक धोके आहेत जे स्मार्टफोन वापरकर्त्यांना वेगवेगळ्या मार्गांनी नुकसान करु शकतात. सध्याच्या परिस्थितीत महिलांनी स्मार्टफोनद्वारे होणारे सायबर धोके व त्या बरोबर येणाऱ्या इतर विविध धोक्यांविषयी जागरूक असणे महत्वाचे आहे.

मोबाइल फोन सुरक्षा व त्या मधील धोक्याचे प्रकार:

  • मोबाइल आणि डेटा सुरक्षे मधील धोके

अनधिकृत किंवा हेतुपूर्वक मोबाईल व त्या मधील माहिती मिळवणे तसेच मोबाईल हरवणे किंवा चोरी जाणे या प्रकारचे धोके.

  • हरवलेले किंवा चोरी झालेले उपकरण

आजकाल स्मार्ट फोन बऱ्याच व्यक्तीच्या आयुष्याचा अपरिहार्य भाग बनला आहे. एखाद्या परिस्थितीत आपला फोन गमावला / विसरला असता; त्या मधील संवेदनशील माहिती हि सायबर गुन्हेगारांच्या हाती लागल्यास गंभीर धोका निर्माण करू शकते. केवळ आपल्या फोन मध्ये असलेले अॅप्स पाहून कुणालाही आपल्या वयाचा, लिंगाचा, ठिकाणाचा, शारीरिक श्रमातील आवडीचा, संभाव्य वैद्यकीय परिस्थिती व होत असलेला त्रासाचा अंदाज करता येतो इतकेच नाही तर स्मार्ट फोन वापरकर्ता जर बाळाची अपेक्षा करत असले तर त्याची देखील कल्पना मिळू शकते.

नेहमी आपला फोन उघडण्या करता संकेतशब्द (पासवर्ड) किंवा बायोमेट्रिक (बोटांचे ठसे) यांचा वापर करा. आपल्या सीम कार्ड चे सीम लॉक सुरु करा, कारण आपला फोन गमवल्या नंतर कुणीही आपला फोन लॉक असतांना देखील आपले सीम सहज वापरू शकतो.

मोबाइल मधील संरक्षणाचा अभाव असणे तसेच ती चोरी जाऊ नये म्हणून त्याविषयी महत्वाची खबरदारी किंवा उपायांचा अभाव असणे. यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या ओळखीस गंभीर धोका उद्भवू शकतो. तसेच आपल्या वैयक्तिक बँकेची माहिती चोरी जाण्याचा देखील धोका उद्भवू शकतो.

मोबाईल फोनमध्ये क्रेडिट कार्ड आणि बँक कार्ड व त्यांचे पासवर्ड इत्यादी महत्वाची माहिती संग्रहित न करणे जास्त योग्य आहे. तसेच अॅप वापल्या नंतर त्या मधून लॉग आउट केल्याचे सुनिश्चित करा.

2.मोबाईल कनेक्टिव्हिटी सुरक्षा सुरक्षा व त्या मधील धोक्याचे प्रकार:

ब्लूटूथ, वाई-फाई, यूएसबी इत्यादीसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून अनोळखी फोन, नेटवर्क किंवा कॉम्प्यूटर इत्यादी ला मोबाईल जोडण्या संबंधित धोके 

मोफत जोडले जाणारे (खुले) वाई-फाई.

बऱ्याचदा खुले वाई-फाई नेटवर्कमध्ये कनेक्ट झाल्यास आपल्या मोबाइल फोनवर अनेक धोके उद्भवतात. खुले वाय-फाय चा वापर करतांना कोणत्याही संवेदनशील माहितीचा व कोणतेही बँक व्यवहारा चा वापर न करण्याचा नेहमीच सल्ला दिला जातो.

आपल्या मोबाइल फोन किंवा लॅपटॉपवर आवश्यक नसल्यास ब्लूटूथ कनेक्शनला अदृश्य मोडमध्ये ठेवा.

जर एखाद्या अज्ञात वापरकर्त्याने ब्लूटूथद्वारे आपल्या मोबाईल फोन किंवा लॅपटॉपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास, त्या ब्लूटूथच्या क्षेत्रापासून दूर जा जेणेकरून संपर्क आपोआप तुटेल.

खुले वाई-फाई नेटवर्कमध्ये आर्थिक, वैद्यकीय किंवा व्यावसायिक कार्ये करू नका, जर आपल्याला आवश्यक असेल तर व्हीपीएन (व्हर्च्युअल खाजगी नेटवर्क) किंवा सुरक्षित नेटवर्क वापरा.

खुले वाई-फाई नेटवर्कमध्ये कोणताही संकेतशब्द (पासवर्ड) आणि संवेदनशील डेटा वापरू नका.

फिशिंग ईमेल

बँक आणि किरकोळ विक्रेत्यां सारख्या विश्वासू प्रेषक कडून येणाऱ्या ईमेल ला ईमेलचे वापरकर्ते बळी पडत राहतात. फसवी (मॅनिपुलेटिव्ह) भाषा ईमेल प्राप्तकर्त्याच्या मनात आणीबाणीची भावना निर्माण करते जी त्यांना चुकीचे निर्णय घेण्यास प्रवृत्त करते. ईमेलचे वापरकरते अंतर्भूत (एम्बेड) केलेल्या लिंकवर क्लिक करतात आणि खोट्या (अविश्वसनीय) साइटवर स्वतःची वैयक्तिक माहिती देतात, सोबत जोडलेले (संलग्नक) माहिती चोरणारे मालवेअर डाउनलोड करतात किंवा संपर्कांतील इमेल्सना घातक  ईमेलपाठवतात.ईमेल वापरतांना नेहमी पुढील गोष्ठी तपासा, ईमेल मधील पत्ते नेहमी प्रेषक नावाशी जुळतात का, बुकमार्क किंवा टाइप केलेला (URL) युआरएल अॅड्रेस बारमध्ये टाकून प्रेषकाच्या वेबसाइटला भेट दयाआणि सर्व डाउनलोड केलेल्या फाइल्स  विश्वासू अँटी-व्हायरस प्रोग्रामसह तपासा.

स्मिशिंग  संदेश

फिशिंग प्रमाणे समान नियम SMS वर लागू होतात. एखाद्या संदेशाचा प्रेषक किंवा प्रेक्षकांच्या हेतूंवर आपल्याला संशय असल्यास, एका फोन कॉलद्वारे संपर्क साधून त्यांनीच आपल्याला संदेश पाठविल्याची पुष्टी करा. संदेश आपल्या बँकेचा असल्यास आपल्या बँकेपर्यंत पोहोचण्याचा किंवा संपर्क साधण्याचा प्रयत्त्न करा - परंतु संदेशां मधील मजकूर द्वारे पाठवलेल्या कोणत्याही URL वर क्लिक करू नका.

कमकुवत प्रमाणीकरण

गुन्हेगारांना अशा मोबाइल पेमेंट प्रणाली आवडतात ज्यात कमकुवत प्रमाणीकरणाची सोय (साधन) आहे.
कोणतीही देयक प्रणालीं आपण वापरता असाल जसे कि ई-कॉमर्स ब्राउझर अॅप्स आणि व्हर्च्युअल वॉलेट्स   या मध्ये बहु-घटक प्रमाणीकरण आणि बहुस्तरीय  (डेटा एन्क्रिप्शन) असणे आवश्यक आहे.

उदाहरणार्थ, सुरक्षित प्रणाली मध्ये वापरकर्त्याची आयडी, संकेतशब्द (पासवर्ड) आणि सुरक्षित प्रतिमा पुष्टीकरण करणे किंवा आपल्या मोबाईल मध्ये एक-वेळ वापरात येणारा पिन संदेश आवश्यक असू शकतो. सर्वोत्तम देयक प्रणाली आपला क्रेडिट कार्डचा डेटा टोकनमध्ये बदलते जेणेकरून तो कोठेही वाचता येणार नाही.

3.मोबाइल ऍप्लिकेशन आणि ऑपरेटिंग

सिस्टम मधील सुरक्षा धोके

मोबाइल अॅप्लिकेशन्स आणि ऑपरेटिंग सिस्टम्समधील कमतरतेमुळे उद्भवणारे धोके.

जेव्हा आपण विनामुल्य असणारे अॅप्स नकळतपणे डाउनलोड करतो तेव्हा आपण ती अॅप्स डाउनलोड करतांना प्रायव्हसी सेटिंग्ज बरोबर आपण काय तडजोड करतो आहे ते आम्ही कधीच तपासत नाही.
असे बरेच अॅप्स आहेत जे आपण आपल्या मोबाइलवर डाउनलोड केल्यानंतर आपली माहिती (डेटा) चोरतात त्यांना मालवेअर अॅप्लिकेशन्स म्हणतात.

अनधिकृत स्त्रोतांमधून सामग्री/ माहिती मोबाइल फोन किंवा लॅपटॉपमध्ये डाउनलोड करणे टाळा. अॅप्स ला कुठलीही परवानगी देण्यापूर्वी विचार करा. मोबाईल मधील फ्लॅशलाइट सारख्या अॅप्सना खरोखर आपल्या मोबाईलचे (डिव्हाइसचे) स्थान माहित असणे आवश्यक आहे का?
अॅप्स वापरात नसताना दिलेल्या गंभीर परवानग्या मागे घेण्याचा विचार करा.

मोबाइल फोनवर होणाऱ्या हल्ल्यांचे विशिष्ट प्रभाव:

  1. मोबाइल फोन मध्ये असलेल्या / प्रसारित केलेल्या वापरकर्त्याच्या वैयक्तिक माहिती / (डेटा एक्सपोजर) चोरी जाण्याचा तोटा.
  2.  दुर्भावनायुक्त सॉफ्टवेअरमुळे अजाणतेपणाने   प्रीमियम आणि महागअ एसएमएस आणि कॉल सेवांचा वापर करून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.
  3.  मोबाईल वर होणाऱ्या गुप्ततेच्या हल्ल्यांमध्ये मोबाईल च्या स्थाना विषयी माहिती, तसेच वापरकर्त्याच्या न कळत कॉल व संदेश पाठवणे यांचा समावेश असतो.
  4. मोबाईलवर नियंत्रण गमावणे आणि नकळतपणे नियोजित हल्ल्यांतून झोम्बी बनणे.
     
Page Rating (Votes : 22)
Your rating: