इंटरनेटचे काही वापरकर्ते लैंगिक आणि हिंसाचारी उद्देशांनी लहान तसेच तरूण मुलामुलींना लक्ष्य करतात. ह्यांना ऑनलाइन प्रीडेटर्स म्हणजे ऑनलिन भक्षक असे नाव आहे. असे भक्षक लहानग्यांचे मतपरिवर्तन करणे, त्यांना लैंगिक बाबींत ओढणे, त्रास देणे, धमकावणे, त्यांच्या वयाला योग्य नसलेल्या गोष्टी दाखवणे इ. प्रकार ऑनलाइन करतात.

संवाद साधण्यासाठी हे भक्षक साधारणतः ह्या मार्गांचा वापर करतात :

सोशल नेटवर्किंग, इमेल्स, चॅटरूम्स, इंस्टंट मेसेजिंग तसेच प्रत्यक्ष भेटून बोलणे असे अनेक मार्ग ऑनलाइन भक्षकांद्वारे वापरले जातात.

 • सोशल नेटवर्क्सच्या वेबसाइट्स : o स्वतःचे मत मांडणे, फोटो आणि व्हीडिओ शेअर करणे आणि संवादांसाठी सोशल नेटवर्किंग साइट्स विलक्षण लोकप्रिय आहेत. ऑनलाइन भक्षक ह्या साइट्सचा पायदा घेऊन खाते उघडतात व स्वतःची ओळख लहान किंवा तरूण असल्य.प्रमाणे सादर करतात. ह्यातून ते ऑनलाइन मैत्री घडवतात आणि वैयक्तिक माहिती मिळवतात. ही तथाकथित मैत्री ते हळूहळू वाढवत नेऊन समोरच्याला आपल्या जाळ्यात ओढतात व संवादाचा गाभा लैंगिक बाबींकडे नेतात.

टिपा : "प्रायव्हसी सेटिंग सारख्या सुविधा वापरा आणि आपली प्रोफाइल मर्यादितच दिसेल अशी व्यवस्था करा."

 • इमेल पत्ता वापरणे : ऑनलाइन भक्षक लहानांचे इमेल पत्ते मिळवून त्यांवर लैंगिक विषयाच्या साइट्सकडे नेणार्‍या लिंक्स किंवा छायाचित्रे पाटवण्यास सुरूवात करतात. ते विविध प्रकारे त्रास देतात, धमकावतात, मुलांच्या मनात लाजिरवाणी बावना उत्पन्न करतात व त्याला बरेचदा लैंगिंक संवाद साधण्यास भाग पाडतात.

टिपा : अज्ञात व्यक्तींकडून आलेल्या इमेल डिलीट करा किंवा उघडूच नका, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.

 • संवाद कक्ष माध्यमातून : ऑनलाइन भक्षक चॅट रूम्सचा वापर करून लहानांशी संवाद सुरू करतात. स्वतःही अल्पवयीन असल्याचे बासवून विश्वास संपादन करतात. मुलांना त्यांचे छंद, आवडीनिवडी इ. विचारून त्यामधून वैयक्तिक माहिती मिळवत राहतात. असे भक्षक भेटवस्तू देतात, फोटो इ. मागतात किंवा प्रायव्हेट चॅटचा आग्रह धरतात. ह्यांचे वागणे खूपच स्नेहाचे आणि सौजन्यपूर्ण असते परंतु नंतर ते हळूहळू लैंगिक विषय मांडू लागतात आणि मुलांना त्याबद्दल पालकांपासून गुप्तता पाळण्यासही सांगतात. असे करण्यास संबंधित मुलाने नकार दिल्यास ते त्याला धमक्या देऊन किंवा घाबरवून त्यांचे म्हणणे ऐकण्यास भाग पाडतात.

टिपा: ऑनलाइन फ्रेंडसना स्वतःची वैयक्तिक माहिती (उदा. छंद, आवडीनिवडी, कौटंबिक तपशील) देऊ नये.

 • मन वळवणे, विचार पटवणे : ऑनलाइन भक्षक प्रथमतः गोड बोलून खोटेपणाने विश्वास संपादन करतात, त्यातून संबंध वाढवतात आणि मुलामुलींना प्रत्यक्ष भेटण्यासाठी आग्रह करतात.

टिपा : कोणीही अपरिचित व्यक्ती आपणांस आपल्या मतांपासून व विचारांपासून दूर नेण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न करती असल्यास तिला दाद देऊ नका. ऑनलाइन फ्रेंड असलेल्या अशा व्यक्तीने प्रत्यक्ष भेटीची वेळ मागितल्यास आपल्या पालकांना तशी कल्पना द्या.

ऑनलाइन भक्षकांद्वारे दिल्या जाणार्‍या धमक्या :

आपण भक्षकांना प्रतिसाद देणे किंवा त्यांच्याशी चॅट करणे, संपर्क ठेवणे थांबवले की अर्थातच त्यांच्याकडून आपल्या कुटुंबियांना किंवा मित्रमैत्रिणींना त्रास देण्यासंबंधीच्या धमक्या येऊ लागतात.

ऑनलाइन भक्षकांना थोपवायचे कसे?

एखादी अपरिचित किंवा अल्पपरिचित व्यक्ती आपणांस – काही कारण नसताना – भेटवस्तू इ. देत असेल, प्रत्यक्ष भेटीचा आग्रह करीत असेल आणि अतिशय प्रेमळपणे वागत असेल तर शंका येण्यास जागा आहे कारण अशी व्यक्ती ऑनलाइन भक्षक असू शकते

 • आपल्या मनात गैरसमज उत्पन्न करण्यासाठी वापरले जाणारे मार्ग समजून घ्या : एखादी अपरिचित किंवा अल्पपरिचित व्यक्ती आपणांस – काही कारण नसताना – भेटवस्तू इ. देत असेल, प्रत्यक्ष भेटीचा आग्रह करीत असेल आणि अतिशय प्रेमळपणे वागत असेल तर शंका येण्यास जागा आहे कारण अशी व्यक्ती ऑनलाइन भक्षक असू शकते व ही आपणांस फसवण्यासाठी टाकलेली पहिली पावले असू शकतात.
 • टोपणनावाचा वापर करा : यूझरनेम म्हणून स्वतःचे खरे नाव वापरू नका, त्याऐवजी टोपणनावाचा उपयोग करा.
 • आपल्या ऑनलाइन प्रोफाइल मध्ये वैयक्तिक माहिती देऊ नका : सोशल नेटवर्क्सवरील आपल्या प्रोफाइलमध्ये वैयक्तिक माहिती देऊ नका कारण नेट वापरणार्‍या प्रत्येकालाच ती दिसत असते.
 • ऑनलाइन चॅटिंगचे नियम स्वतःच ठरवा : चॅट वापरण्याचा कालावधी स्वतःच ठरवून तो पाळा आणि पालकांच्या मार्गदर्शनाखालीच इंटरनेट वापरा. चॅट करण्याचा कॉँप्यूटर सामाईक वावराच्या खोलीतच असेल असे पहा.
 • घरच्या किंवा शाळेतल्या समस्यांवर चॅट करू नका : आपले वय, राहण्याचे ठिकाण, आपण मुलगा आहोत की मुलगी अशा तर्‍हेचे संदर्भ चॅटमध्ये देऊ नका तसेच घरच्या किंवा शाळेतल्या समस्या चॅटमार्फत इतरांना सांगू नका.

आपणांस धमकी दिली गेल्यास :

 • घाबरू नका : शांत रहा, चॅट थांबवा व लॉगऑफ करा किंवा चॅटरूमच्या बाहेर पडा.
 • नाही म्हणण्यास घाबरू नका : भक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी करण्याची आपली तयारी नसल्यास त्यांना न घाबरता तसे सांगा.
 • पालकांना कळवा : आपणांस कोणी धमकावल्यास किंवा त्रास दिल्यास पालकांना लगेचच त्याबद्दल सांगा.
 • आपल्या संवादाचा स्क्रीनशॉट घ्या व तो पुरावा म्हणून पोलिसांना दाखवला जाईल असे भक्षकाला सांगा : कोणी आपल्याशी असभ्य भाषेत संवाद केल्यास किंवा धमकावल्यास त्या संवादाचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, तो नंतर गरज पडल्यास पुरावा म्हणून वापरता येईल.
 • लगेच लॉगऑफ करू नका : कोणी आपल्याशी असभ्य भाषेत संवाद केल्यास किंवा धमकावल्यास लगेचच लॉगऑफ करू नका, पालकांना व पोलिसांना कळवा.
 • पोलिसांच्या सायबर-गुन्हे शाखेला कळवा : आपल्या कुटुंबियांना त्रास देण्याची गंभीर धमकी कोणी दिल्यास पोलिसांच्या सायबर-गुन्हे शाखेला तसे लगेचच कळवा.
Page Rating (Votes : 13)
Your rating: