तांत्रिक प्रगतीच्या ह्या जमान्यात कॉँप्यूटर आणि माहिती तंत्रज्ञानाने आधुनिक नागरिकांना अनेक तांत्रिक सोयीसुविधा मिळाल्या असल्या तरी ह्याच तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन, विशिष्ट पद्धतीने, गुन्हे करणार्‍यांनाही मोकळे रान मिळते आहे. पोलिसांना तंत्रज्ञानाधारित गुन्ह्यांचा सामना करता यावा, सायबरविश्वात कायदा व सुव्यवस्था राखता यावी आणि डिजिटल भारतातील नागरिकांना सुरक्षितपणे जगता यावे ह्या हेतूने पोलिसांना सायबर सुरक्षिततेविषयी जागरूक केले जात आहे .

पोलिसखात्यातील व्यक्तींना तंत्रज्ञान, उपकरणांची कार्यपद्धती, इंटरनेटची कार्यपद्धती, ऑनलाइन फसवणुकीत नागरिकांना कशाप्रकारे लक्ष्य केले जाते, गुन्ह्यांची उकल करण्यासाठी उपयुक्त साधने, गुन्हेगारांना शिक्षेच्या कक्षेत आणण्यासाठी केलेले विविध आयटी कायदे इ. बाबींची नीट माहिती असणे आवश्यक आहे.

सायबरविश्वाशी संबंधित विविध मुद्दे समजून घेण्यासाठी पोलिसांना त्याबद्दलची जाणीव असणे गरजेचे ठरते कारण सुरक्षितता-विषयक मार्गदर्शनामुळे ते स्वतः सुरक्षित राहतात आणि इंटरनेट वापरणार्‍या नागरिकांनाही सुरक्षित राहण्याबद्दल जागरूक करू शकतात.

Page Rating (Votes : 31)
Your rating: