प्रत्येकच समाजामध्ये शिक्षकांना अतिशय महत्त्व आहे कारण समाज ज्या सुज्ञ नागरिकांवर चालतो ते घडवण्याचे मोठे काम शिक्षक करतात. विद्यार्थ्यांचे स्फूर्तिस्थान म्हणजे उत्तम शिक्षक. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहित केले जाते. शिक्षक पालकांनाही योग्य सल्ला देतात आणि विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी व हितसंबंधांचे रक्षण करू शकतात. आपल्या विद्यार्त्यांना योग्य शिक्षण आणि प्रशिक्षण देणे हे प्रत्येक शिक्षकाचे कर्तव्य व जबाबदारीही आहे. विद्यार्थ्यांचा शिक्षकांवर विश्वास असतो आणि समाजानेही दाखवलेल्या ह्या विश्वासाला तडा जाऊ न देण्याची जबाबदारी शिक्षकांची असते. ह्याकरिता शिक्षकानेही समाजात मिसळणे व समाजात स्वतःची पाळेमुळे रोवणे आवश्यक असते. इंटरनेट, त्याचे फायदे-तोटे ह्या बाबींची जाणीव व ज्ञान शिक्षकाला असणे गरजेचे आहे. हे फायदे-तोटे विद्यार्थ्यांना समजावताना सायबर सुरक्षिततेचीही माहिती पुरवणे तसेच सुरक्षितपणे ऑनलाइन कसे वावरावे हेदेखील सांगणे अत्यावश्यक आहे. म्हणजेच सायबर-धोके आणि आणि त्यांपासून दूर कसे रहावे हे खुद्द शिक्षकांना माहीत असणे गरजेचे आहे तरच है ज्ञान विद्यार्थी व पालकांना पुरवणे त्यांना शक्य होईल. येथे दिलेल्या सायबरविश्वाबद्दलच्या टीपांचा उद्देश माहितीची सुरक्षितता, सायबर-सुरक्षा, सायबर-बुलिइंग उर्फ दमदाटी, ऑनलाइन सुरक्षितता ह्यांसारख्या बाबी शिक्षकांना समजावण्याचा आहे.

Page Rating (Votes : 188)
Your rating: