ऑनलाइन खरेदी - ऑनलाइन खरेदी एक वैभवशाली आविष्कार आहे जो लोकांना त्यांच्या घरातील सोई-सुविधा सांभाळून वस्तू खरेदी करण्यास परवानगी देते.योग्य वस्तू च शोध घेत एकाधिक स्टोअरमध्ये आता प्रवास करावा लागत नाही; उत्साही असलेल्या सेल्स पर्सन ला सामोरे जावे लागत नाही; चेकआउट काउंटरवर रांगेत उभे राहावे लागत नाही.ई-कॉमर्स ने निश्चितपणे चांगल्या प्रकारे खरेदी करण्याचे मार्ग बदलले आहेत.परंतु, इतर सर्व गोष्टींप्रमाणेच, ऑनलाइन खरेदीचे जग हे वाटते तितके सोपे नाही. ई-कॉमर्स कंपन्यां जरी ग्राहकांच्या समस्या कमी करण्याच्या प्रयत्नात असल्या , तरी काही समस्या आहेत ज्याना अद्याप ऑनलाइन खरेदी करताना ग्राहकांना तोंड द्याव्या लागतात.
चला सायबर गुन्हेगार महिलांना लक्ष्य करू शकतील असे काही मार्ग पाहू
स्वस्त किंमतीत महाग असलेली ब्रँडेड उत्पादने:
सोशल नेटवर्किंग साइट्समध्ये आपल्याला बर्याचदा अविश्वसनीय किंमतींवर महाग असलेली ब्रँडेड उत्पादने कमी किमतीमध्ये देणाऱ्या जाहिराती मिळतात. यामुळे ग्राहकांमधील संभाव्य महिलांचे लक्ष वेधले जाते आणि ते त्या उत्पादनांसाठी पैसे देऊ इच्छितात ज्या वास्तविक नसतातच. उदाहरणार्थ ब्रँडेड पिशव्या, कपडे, महाग फोन आणि सौंदर्य उत्पादने.
वजन कमी करण्यासाठी नैसर्गिक उपायः
बर्याचदा आमच्या सोशल नेटवर्किंग आणि इन्स्टंट मेसेजिंग ऍप्लिकेशन्समध्ये वजन कमी करण्याचे मेसेज येतात आणि ते त्यांच्या उत्पादनाची खरेदी करण्यासाठी विनंती करतात. ज्या स्त्रिया वजन कमी करण्यासाठी आसुसलेल्या असतात ते या संदेशांमुळे अडकल्या जातात आणि नकली उत्पादनांसाठी पैसे भरतात.
महागडे दागदागिने:
सायबर गुन्हेगार विशिष्ट दागदागिने ऑनलाइन विकणारी खोटी वेबसाइट बनवू शकतात आणि महिला ग्राहकांना लक्ष्य करण्यासाठी दागिन्यांच्या विक्रीकरिता आकर्षक ऑफर देऊ शकतात. काही लोक विशिष्ट किंमतीसह ऑनलाइन उत्पादने खरेदी करतो परंतु कमी किंमतीचे इतर उत्पादने आपल्याला भेटतात आणि त्यांना लक्ष्यात येत कि फसवणूक झाली आहे आणि जेव्हा मूळ वेबसाइटवर तक्रार करतात तेव्हा ते त्यांच्या वेबसाइटद्वारे खरेदी केलेलेच नाही असे सांगतात. यामुळे तुमची वित्तीय हानी होऊ शकते.
ऑनलाइन खरेदीमधील धोके
आपण ऑनलाइन खरेदी सुरु करण्यापूर्वी आपल्याला काही प्रश्न तपासण्याची आवश्यकता आहे
ब्रँड- ई कॉमर्स साइट वास्तविक आहे का?
सुरक्षा- तुमचे क्रेडिट कार्ड सुरक्षित आहे का?
गोपनीयता- आपली माहिती विकली जात आहे का?
शिपिंग - आपल्याला विनंती केलेल्या वेळी योग्य उत्पादन मिळत आहे?
सुरक्षित ऑनलाइन खरेदीसाठी काही टीप :
- संगणकाची OS अद्ययावत ठेवा:
आपल्या पीसीला अँटीव्हायरस, अँटी स्पायवेअर, फायरवॉल विश्वासार्ह साईटद्वारे सर्व पॅच आणि वेब ब्राउझरसह अपडेट केलेले आहे हे सुनिश्चित करा.
- केवळ विश्वासार्ह साइट्सद्वारेच खरेदी करा:
ज्या साइटवर आपण वस्तू खरेदी करू इच्छिता त्या वेबसाईटवर संशोधन करा, कारण आक्रमणकर्ते किंवा फसवणारे लोक कायदेशीर दिसणार्या वेबसाइट्सवर फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्या साईट्स खऱ्या नसतात. म्हणून विक्रेत्याचा टेलिफोन नंबर,प्रत्यक्ष पत्ता लक्षात ठेवा आणि वेबसाइट विश्वसनीय साइट असल्याचे सुनिश्चित करा.विविध वेबसाइट्स शोधा आणि किंमतींची तुलना करा. त्या विशिष्ट वेबसाइट्स किंवा व्यापार्यांमधील ग्राहकांचे आणि मीडियाचे दिलेला शेरा/मत तपासा.
- वेबसाइटच्या सुरक्षिततेचे पैलू तपासा:
जर आपण एखादे ऑनलाइन खरेदी करण्याची तयारी करत असाल तर साइट ऍड्रेस बार किंवा ब्राउजर ऍड्रेस बार वर HTTPS सह पॅडलॉक आहे का हे तपासा आणि त्या नंतर वित्तीय व्यवहार करा.
- आपल्या डिजिटल पेमेंटचा मागोवा ठेवा:
आपण कार्ड पेमेन्ट केल्यानंतर, क्रेडिट कार्ड स्टेटमेन्ट ताबडतोब तपासा आणि आपण अदा केलेल्या शुल्काबद्दल जाणून घ्या; आणि आपल्याला कोणतेही बदल आढळल्यास संबंधित अधिकार्यांकडे त्वरित तक्रार नोंदवा.
- वेबसाइट वर कार्ड तपशील किंवा बँक तपशील जतन करू नका:
डेबिट किंवा क्रेडिट ची माहिती, खरेदी करणार्या वेबसाइटवर जतन करू नका. आपले ऑनलाइन खरेदी पूर्ण केल्यानंतर सर्व वेब ब्राउझर कुकीज साफ करा आणि आपले पीसी बंद करा. स्पॅमर्स आणि फिशर्स इंटरनेटशी कनेक्ट केलेल्या सिस्टमचा शोध घेतील आणि स्पॅम ईमेल पाठविण्याचा प्रयत्न करतील आणि आपल्या वैयक्तिक माहिती गोळा करू शकणार्या दुर्भावनापूर्ण सॉफ्टवेअरची स्थापना करण्याचा प्रयत्न करतील
- आपल्या खरेदीबद्दल विचारणा करणार्या ईमेलला कधीही प्रतिसाद देऊ नका:
"कृपया आपल्या देयाची पुष्टी करा, खरेदीसाठी आणि खात्यासाठी तपशीलाची पुष्टी करा" सारख्या ईमेल पासून सावधगिरी बाळगा. कायदेशीर व्यवसाय करणारे लोक अशा ईमेल कधीही पाठवत नाही. जर आपल्याला असे ईमेल प्राप्त झाले तर त्वरित मालकाला कॉल करा आणि त्यास कळवा.
- वारंवार संकेतशब्द बदला:
बर्याच काळासाठी एक पासवर्ड वापरू नका, आपला ईमेल आयडी, बँक खाते, क्रेडिट डेबिट कार्ड चा पासवर्ड वारंवार बदला.
- भिन्न वेबसाइट्ससाठी भिन्न पासवर्ड :
हॅकर्स आपला एक पासवर्ड क्रॅक करू शकले तर सारखेच पासवर्ड सगळ्या ठिकाणी वापरत असाल तर ते बाकी सर्व वेबसाइट्स हॅक करू शकतील.म्हणून सर्व वेबसाइट्ससाठी भिन्न पासवर्ड वापरा. तसे सर्व संकेतशब्द लक्षात ठेवणे अधिक कठीण आहे परंतु ते सुरक्षा देखील तितक्याच स्तरावर वाढवते.
सुरक्षित नेटवर्क वापरा:
नेहमी सुरक्षित इंटरनेट कनेक्शन वापरा. सार्वजनिक वाय-फाय स्पॉट्स सायबर हल्ल्यांना बळी पडतात.
- सवलत / बक्षिसे देऊ केलेल्या दुव्यांवर क्लिक करू नका:
सायबर गुन्हेगार लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट्समध्ये मोठ्या प्रमाणात सवलत दाखवून मेसेज पाठवत असतात. व्हाट्सएप ग्रुप्समध्ये किंवा अज्ञात नंबरांमधील प्राप्त दुव्यांवर क्लिक करण्याऐवजी ऑफरसाठी मूळ वेबसाइट तपासणे नेहमीच चांगले असते.