यूएसबी (युनिव्हर्सल सिरीयल बस) स्टोरेज डिव्हाइसेस विविध संगणकांमधील डेटा स्थानांतरीत करण्यास सोयीस्कर आहेत. आपण यास यूएसबी पोर्टमध्ये प्लग करू शकतो, आपला डेटा कॉपी करू शकतो, तो काढून टाकू शकतो आणि आपले स्टोरेज डिव्हाइस रिकामे करू शकतो. दुर्दैवाने ही पोर्टेबिलिटी, सोयी सुविधा आणि लोकप्रियता आपल्या संगणका मधील माहितीसाठी भिन्न धोके देखील निर्माण करते.

डेटा चोरी आणि डेटा लिकेज (माहिती चोरीस जाणे) आता दररोज बातम्यामध्ये ऐकयला मिळते! हे सर्व माहिती काळजीने, जागरूकपणे आणि योग्य साधने वापरुन नियंत्रित किंवा कमी केले जाऊ शकते.

धोके

1. मालवेअर संक्रमण

 • यूएसबी स्टोरेज डिव्हाइसेसद्वारे मालवेअर पसरतो. आपल्या ऍक्टिव्हिटीस, फायली, सिस्टम आणि नेटवर्कचा मागोवा घेण्यासाठी कोणीतरी जाणूनबुजून मालवेअरसह यूएसबी स्टोरेज डिव्हाइसेस विकू शकतो.
 • autorun.exe वापरुन यूएसबी स्टोरेज डिव्हाइसेसद्वारे मालवेअर एका डिव्हाइसवरून दुसर्या डिव्हाइसमध्ये पसरू शकते, जे डीफॉल्ट ऍक्टिव्ह असते

2. अनधिकृत वापर

 • कोणीतरी डेटासाठी आपल्या यूएसबी डिव्हाइसची चोरी करू शकतो.

3. Baiting (फसवणे)

 • कुणीतरी मुद्दाम आपल्या डेस्क किंवा जागेवर  मालवेअर असलेला यूएसबी डिव्हाइस ठेऊ शकतो.

यूएसबी स्टोरेजद्वारे डेटा लीकेज कसे थांबवावे?

 •  यूएसबी स्टोरेज डिव्हाइसेसचा वापर मर्यादित करण्यासाठी करणे, मजबूत सुरक्षा धोरणाची रचना करा आणि त्याचा अवलंब करा.
 • कर्मचारी काय कॉपी करत आहे यावर लक्ष्य ठेवा. 
 • आपली माहिती सुरक्षित करण्यासाठी प्रमाणीकरण, अधिकृतता आणि लेखांकन लागू करा.

डिव्हाइस गमावल्यास काय करावे?

 • आपण यूएसबी ड्राईव्हमध्ये पासवर्ड इत्यादि सारखी कोणतीही वैयक्तिक किंवा संवेदनशील माहिती संग्रहित केली असल्यास, सुरक्षा प्रश्नांसह सर्व संकेतशब्द त्वरित बदलून घ्या आणि कोणत्याही खात्याच्या निर्मितीदरम्यान दिलेली सर्व  उत्तरे द्या [हॅकर तुमच्या चोरलेल्या ड्राईव्ह मधून पासवर्ड  तुमचे खाते वापरू शकतो आणि सर्व  माहिती  मिळवू शकतो.
 • गमावलेल्या डेटाच्या विरोधात सर्व सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत हे देखील सुनिश्चित करा.

डिव्हाइसची चोरी कशी थांबवायची?

 

 • तुमच्या ड्राइव्हला नेहमी कीचैन लावून सुरक्षित ठेवा.
 • कधीही आपला ड्राइव्ह काम नसताना सोडून जाऊ नका.
 • कधीही संवेदनशील माहिती एन्क्रिप्शन केल्याशिवाय त्यामध्ये ठेवू नका.

मोबाइल चा वापर यूएसबी म्हणून करणे

संगणकाशी कनेक्ट केलेले असताना मोबाईल फोन यूएसबी मेमरी डिव्हाइसेस म्हणून वापरल्या जाऊ शकतात. संगणकाशी जोडण्यासाठी मोबाईल फोनसह एक यूएसबी केबल प्रदान केला जातो.

 • जेव्हा एक वैयक्तिक फोन एखाद्या वैयक्तिक संगणकाशी कनेक्ट केला जातो, तेव्हा अद्ययावत अँटीव्हायरस वापरून बाह्य फोन मेमरी आणि मेमरी कार्ड स्कॅन करा.
 • आपल्या फोनचा आणि बाहेरील मेमरी कार्डचा नियमित बॅकअप घ्या  कारण जर सिस्टम क्रॅश झाली किंवा मालवेअर चा प्रवेश झाला तर आपला डेटा सुरक्षित राहील.
 • संगणकावरून मोबाइलवर डेटा स्थानांतरित करण्यापूर्वी, सर्व अद्यतनांसह नवीनतम अँटीव्हायरससह डेटा स्कॅन करावा.
 • आपले काम झाल्यावर आपल्या संगणकावरून यूएसबी कनेक्शन काढून टाकण्याचे लक्षात ठेवा.
 • इतर मोबाईलवर व्हायरस प्रभावित डेटा कधीही फारवर्ड करू नका.
Page Rating (Votes : 9)
Your rating: