भारतात मोठ्या प्रमाणामध्ये लोक सोशल मीडियावर आहेत, जेथे महिला रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इंटरनेट चा वापर करतात. सोशल मीडियावर किंवा इंटरनेट द्वारे जोडलेल्या समुदायाचा एक भाग असलेल्या अनेक महिला ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाइन व्यवहार ,प्रवास, संपर्क, ईमेल, पाककृतीचे व्हिडिओ बघणे, जॉब सर्च करणे, योग व्हिडिओ, नवीन मातांसाठी असलेले पालकोपयोगी सल्ले, नवीन व्यवसायामध्ये उद्योजिक सहाय्यासाठी इत्यादी अनेक कारणांसाठी इंटरनेट चा वापर केला जातो. बहुतेक महिला त्यांच्या मोकळ्या वेळेत इंटरनेटचा वापर करतात. सर्वसाधारणपणे, स्त्रीयांचा स्वभाव हा खूप साधा/ सरळ असतो. त्या सर्वांची काळजी घेतात त्या निष्पाप, समर्पित, प्रामाणिक असतात आणि जे काही ते पाहतात त्यावर विश्वास ठेवतात जे नेहमी सत्यच असत असे नाही. सायबर गुन्हेगार स्त्रियांच्या संवेदनशीलतेचा फायदा घेतात ज्यामुळे स्त्रियां सायबर गुन्ह्यांमध्ये मोठा प्रमाणात बळी पडतात.

इंटरनेटने मुळे आजचे डिजिटल जगामध्ये आपले जीवन अधिक सोयीस्कर झाले आहे, परंतु याचा तोटे देखील आहेत. स्वार्थी हेतूने इंटरनेट वापनार्यासाठी व त्यावर शोषण करू इच्छिणार्यांसाठी इंटरनेट वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देते. या कारणाने मालवेअर, फिशिंग (फसवणारे/जाळे टाकणारे), फार्मिंग, माहिती चोरी करणारे, स्पूफिंग, ऑनलाइन घोटाळे, व्हायरस, ट्रोजन, रॅन्सोमवेअर (खंडणीखोर व्हायरस) आणि इतर बरेच धोके उद्भवतात. परंतु चिंता करण्याची गरज नाही; कारण सुरक्षेची लहान पावले उचलून आपण स्वत: ला या सायबर जगात खूप सुरक्षित ठेवू शकतात.

भारत सरकारद्वारे माहिती सुरक्षा शिक्षण व जागरुकता (आय एस ई ए) फेज 2 प्रकल्पाची माहिती सर्वसामान्य जनतेस मिळावी व त्या द्वारे जागरूकता व प्रोत्साहन मिळावे आणि मुख्ता स्त्रियांना सायबर सुरक्षा व त्या बद्दलची जागरूकता करून देणे आणि या डिजिटल जगामध्ये सुरक्षित कसे राहावे या करता मार्गदर्शकतत्त्वे तयार केले आहेत. Www.infosecawareness.in या वेबसाईट वरील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करुन महिला स्वत:चे संरक्षण करू शकतात, तसेच इतर महिला सहकार्यांमध्ये देखील ही जागृती पसरविण्यासाठी सहभागी होऊ शकतात. सायबर जागरूक नागरिक बना आणि भारताला सायबर जागरूक राष्ट्र बनवा.

'स्वत: ला आणि राष्ट्राला सुरक्षित करा'

Page Rating (Votes : 10)
Your rating: